• केंद्रीय मनुष्यबळ विकास, इलेक्ट्रॉनिक्स, दळणवळण आणि माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री श्री. संजय धोत्रे यांच्या हस्ते बहुपयोगी 'भारत एअर फायबर सर्व्हिसेस' चे उद्घाटन करण्यात आले. 'डिजीटल इंडिया' सारख्या दूरगामी परिणामदर्शक योजनेचा एक भाग म्हणून याचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर सेवांचे उद्घाटन महाराष्ट्रातील अकोला येथे करण्यात आले.

  • भारत संचार निगम लिमिटेड (Bharat Sanchar Nigam Limited - BSNL) मार्फत भारत सरकारच्या 'डिजीटल इंडिया' पुढाकाराचा एक भाग म्हणून 'भारत एअर फायबर सेवा' सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: श्री. उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: भगतसिंग कोश्यारी हे सध्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना: १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती

  • विशेषता: क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील ३ रे मोठे राज्य आहे.

  • राजधानी: मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.

  • अधिकृत भाषा: मराठी ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा म्हणून वापरली जाते.