• पुरेसे भांडवल आणि मिळकतीची संभावना नसल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) महाराष्ट्रातील कोल्हापूरस्थित शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • परवाना रद्द करण्यात आल्यामुळे DICGC अधिनियम १९६१ नुसार ठेवीदारांना पैसे देण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

DICGC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: DICGC म्हणजेच Deposit Insurance and Credit Guarantee Corporation अर्थात ठेव विमा आणि पत हमी महामंडळ होय.

  • अध्यक्ष: मायकेल पात्रा हे सध्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १९६१ साली DICGC ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे DICGC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

RBI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.

  • सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.