• पश्चिम बंगाल सरकारमार्फत गरीब आणि निराधारांना अनुदानित शिजवलेले जेवण ५ रुपये दरात उपलब्ध करून देण्यासाठी ‘माँ कॅन्टीन (Maa Canteen)’ योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारतर्फे १५ रुपये इतके अनुदान देण्यात येईल तर लोकांना ५ रुपये द्यावे लागतील.

  • स्वयंपाकघराची जबाबदारी स्वयं-सहाय्यता गटाकडे (Self-Help Groups - SHG) सोपविण्यात आली आहे.

  • सदर प्रकल्पासाठी सरकारमार्फत १०० कोटींचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे.

पश्चिम बंगाल राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी पश्चिम बंगाल राज्याची स्थापना झाली होती.

  • मुख्यमंत्री: ममता बॅनर्जी या सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • राज्यपाल: जगदीप धनखार हे राज्यपाल पदावर आहेत.

  • राजधानीचे ठिकाण: कलकत्ता हे पश्चिम बंगालच्या राजधानीचे ठिकाण आहे.