• भारतीय क्रिकेट जगतातील प्रसिद्ध खेळाडू एम. एस. धोनी आणि सुरेश रैना यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतात खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये मात्र ते सहभागी होतील .

एम. एस. धोनी बद्दल ठळक मुद्दे

  • धोनी सध्या ३९ वर्षांचा असून तो भारतासाठी विश्वचषक जिंकणारा कर्णधार राहिला आहे.

  • एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. २०१९ च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीवेळी तो न्यूझीलंडविरुद्ध अंतिम वेळी भारतीय क्रिकेट संघाकडून खेळला होता.

  • २०१८ मध्ये पद्मभूषण, २००९ मध्ये पद्मश्री आणि २००७-२००८ मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले आहे. २०११ मध्ये त्याच्या नेतृत्वात भारताने एकदिवसीय विश्वकरंडक जिंकला होता.

  • २००८ आणि २००९ मध्ये धोनी 'वन डे प्लेयर ऑफ द इयर(ODI Player of the year) अवॉर्ड' जिंकणारा पहिला खेळाडू ठरला होता.

  • भारतीय सैन्यामार्फत २०११ मध्ये त्याने लेफ्टनंट कर्नल पदाचा मान मिळविला होता.

  • कपिल देवच्या नेतृत्वात भारताने १९८३ मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर भारताला पुन्हा एकदा विश्वचषक जिंकून देणारा धोनी हा दुसरा भारतीय कप्तान आहे.

  • एम. एस. धोनीला 'आयसीसी वर्ल्ड वन डे इलेव्हन (ICC World ODI XI.)' मध्येही सहभागी होण्याचा मान मिळाला होता.

  • २०११ मध्ये त्याला 'कॅस्ट्रॉल इंडियन क्रिकेटर ऑफ द इयर(Castrol Indian Cricketer of the year)' पुरस्कार देण्यात आला होता.

  • २००६ मध्ये, त्यांना 'एमटीव्ही युथ आयकॉन ऑफ द इयर (MTV Youth Icon of the year)' पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले होते.

  • २०१३ मध्ये त्याला 'एलजी पीपल्स चॉईस अवॉर्ड'(LG People’s Choice Award) मिळाला होता.

  • २०११ मध्ये डी मॉन्टफोर्ट विद्यापीठाने (De Montfort University) त्यांना मानद डॉक्टरेटची पदवी प्रदान केली होती.

सुरेश रैना बद्दल ठळक मुद्दे

  • टी-२० सामन्यात शतक करणारा तो जगातील पहिला फलंदाज आणि पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.

  • २०११ मध्ये विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय संघाचा तो एक भाग राहिला होता.

  • आयपीएलमध्ये १०० षटकार ठोकणारा ख्रिस गेलनंतर तो पहिला भारतीय आणि जगातील दुसरा खेळाडू होता.

  • क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत त्याचे कौशल्य विशेष स्वरूपाचे होते.