• भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) नुकताच महाराष्ट्र राज्यातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा (Vasantdada Nagari Sahakari Bank) परवाना रद्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • वसंतदादा नागरी सहकारी बँक लिमिटेडला ठेवी स्विकारणे तसेच ठेवींची परतफेड करणे इ. सह बँकिंगशी संबंधित कोणत्याही बाबी करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

RBI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.

  • सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.