• 'भारतीय जीवन विमा निगममार्फत (Life Insurance Corporation - LIC)' आपल्या संभाव्य ग्राहकांना ऑनबोर्ड करण्याच्या उद्देशासाठी पुरवठादार आणि मध्यस्थांसाठी 'ANANDA' नावाच्या मोबाईल अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • 'ANANDA' म्हणजेच 'आत्म निर्भर एजंट्स न्यू बिझनेस डिजीटल अ‍ॅप्लिकेशन (Atma Nirbhar Agents New Business Digital Application)' होय.

  • सदर अ‍ॅप्लिकेशन हे नवीन व्यवसाय प्रक्रियेसाठी कागदरहित उत्तर म्हणून उपयुक्त ठरणार आहे.

LIC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: LIC म्हणजेच Life Insurance Corporation of India अर्थात भारतीय जीवन विमा निगम होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे LIC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: एम. आर. कुमार हे सध्या LIC च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १ सप्टेंबर १९५६ रोजी LIC ची स्थापना करण्यात आली होती.