• भारतात महिलांसाठी लग्नाचे किमान वय १८ वरून २१ पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळामार्फत नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सध्या पुरुषांसाठी विवाहाचे किमान वय २१ असून महिलांसाठी ते १८ इतके आहे.

  • सदर योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकार 'बालविवाह प्रतिबंध कायदा', 'विशेष विवाह कायदा' आणि 'हिंदू विवाह कायद्यात' सुधारणा करण्याचा विचार करणार आहे.

  • सदर प्रस्तावामुळे मुलींना आपल्या स्वातंत्र्याचा आनंद घेणे तसेच रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होणे या बाबींमध्ये फायदा होईल अशी अपेक्षा आहे.