• नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री. हरदीपसिंग पुरी यांच्यामार्फत आंध्र प्रदेशमधील कुर्नूल विमानतळाचे व्हर्च्युअली उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे 

  • कुर्नूल विमानतळावरील उड्डाण कार्य २८ मार्च २०२१ रोजी सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

आंध्र प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली होती.

  • राज्यपाल: विश्वभूषण हरीचंदन हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने आंध्र प्रदेश राज्य देशात ७ व्या क्रमांकावर आहे.