• १९९८ च्या पोखरण येथील अणू चाचणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे भारतीय अणु वैज्ञानिक कृष्णमूर्ती संथानम यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • संथानम हे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (Defence Research and Development Organization - DRDO), अणु ऊर्जा विभाग (Department of Atomic Energy - DAE) तसेच संरक्षण अभ्यास आणि विश्लेषक संस्था (Institute for Defence Studies and Analyses - IDSA) यांच्याशी संबंधित होते.

  • १९९९ मध्ये भारत सरकारच्या वतीने त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.