• भारती अक्सा जनरल इन्शुरन्समार्फत (Bharti AXA General Insurance) शेतकऱ्यांसाठी शेतीच्या गरजा भागविण्यासाठी संबंधित माहिती उपलब्ध करुन देणाऱ्या 'कृषी सखा (Krishi Sakha)' नावाच्या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर अ‍ॅप शेतकर्‍यांना उत्कृष्ट शेती पद्धतींचा अवलंब करण्यास तसेच उत्पादकता वाढविण्यास मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने अत्यंत सहाय्यभूत ठरेल अशी अपेक्षा आहे.

  • पीक विम्यासंबंधीच्या माहितीसाठी या अ‍ॅपद्वारे शेतकर्‍यांना प्रधानमंत्री फसल बीमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana - PMFBY) पोर्टलवरून माहिती मिळवणे शक्य होणार आहे.

भारती अक्सा जनरल विमाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २००८ साली भारती अक्सा जनरल विमाची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे 'भारती अक्सा जनरल विमा' च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संजीव श्रीनिवासन हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.