• युनेस्कोमार्फत कोलकाता येथील 'दुर्गा पूजा' ला २०२१ सालच्या 'अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या (Intangible Cultural Heritage)' यादीमध्ये मान्यता जाहीर करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर कृतीमुळे ३३१ वर्षे जुन्या शहराच्या तसेच पश्चिम बंगाल राज्याच्या सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.

UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.