• मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमधील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • नांदलस्कर यांनी १९८२ मध्ये ‘नवरे सगळे गाढव’ नावाच्या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते.

  • ‘गाव थोर पुढारी चोर’ तसेच ‘जरा जपून करा’ यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी उत्तम अभिनय केला होता.

  • खाकी (२००४), वास्तव: द रिअलिटी (१९९९), जिस देश में गंगा रहता है (२०००), सिंघम (२०११) आणि सिम्बा (२०१८) अशा काही प्रमुख हिंदी चित्रपटांमधील भूमिकांमुळे ते प्रसिध्द होते.

  • महेश मांजरेकर यांच्या ‘१९६२: द वॉर इन द हिल्स’ नावाच्या वेब सीरिजमध्ये त्यांनी अखेरची भूमिका साकारली.