-
शेतकऱ्यांसाठी उत्तर प्रदेश सरकारमार्फत ‘किसान कल्याण अभियानाचे (Kisan Kalyan Mission)' अनावरण करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशपूर्तीसाठी सदर विशेष कार्यक्रम राज्य सरकार सुरू करणार आहे.
-
'किसान कल्याण अभियान' कार्यक्रमात राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा समावेश असेल अशी अपेक्षा आहे.
उत्तर प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: योगी आदित्य नाथ हे सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत.
-
राज्यपाल: आनंदीबेन पटेल या सध्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २४ जानेवारी १९५० रोजी उत्तर प्रदेशला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर प्रदेश राज्याचा देशात चौथा क्रमांक लागतो.