• भारतीय कृषी संशोधन परिषदेने (Indian Council of Agricultural Research - ICAR) २०२० चा प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय 'किंग भूमीबोल जागतिक मृदा दिन पुरस्कार (King Bhumibol World Soil Day Award)' जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • अन्न व कृषी संघटनेमार्फत (Food and Agriculture Organization - FAO) दरवर्षी सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

  • जागतिक मृदा दिनानिमित्त ICAR ला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पुरस्काराबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २०१८ मध्ये सदर पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती.

  • पुरस्कार प्रायोजक: सदर पुरस्कार थायलंडमार्फत प्रायोजित करण्यात आला आहे.

FAO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: FAO म्हणजेच Food and Agriculture Organization अर्थात अन्न व कृषी संघटना होय.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली संस्थेची स्थान करण्यात आली होती.

  • संस्थेचे प्रमुख: क्यू डोंग्यू हे सध्या संस्थेच्या प्रमुख पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: रोम, इटली हे संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.