• केरळ राज्य सरकारमार्फत कोझीकोडमध्ये भारतातील पहिले ‘जेंडर पार्क (Gender Park)’ सुरू करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • आंतरराष्ट्रीय लिंग समानता परिषदेच्या (International Conference on Gender Equality - ICGE) दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने सदर पार्क कार्यान्वित करण्यात येणार आहे.

  • केरळचे मुख्यमंत्री श्री. पिनाराई विजयन यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन नियोजित आहे.

  • लिंग-आधारित विषयांवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने सदर जेंडर पार्क स्थापन करण्यात येणार आहे.

केरळ राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्य दर्जा प्राप्त वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: तिरुवनंतपूरम ही केरळ राज्याची सध्याची राजधानी आहे.

  • राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान हे केरळच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • मुख्यमंत्री: पिनाराई विजयन हे सध्या केरळच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.