-
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत (National Statistical Office - NSO) 'राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (National Sample Survey -NSS)' च्या ७५ व्या फेरीचा एक भाग म्हणून 'घरगुती सामाजिक उपभोग: भारतातील शिक्षण (Household Social Consumption: Education in India)' या विषयावर आपला अहवाल जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर सर्वेक्षणात जुलै २०१७ ते जून २०१८ या कालावधीतील साक्षरतेचा राज्यानुसार सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
-
सर्वेक्षणानुसार देशामध्ये केरळ राज्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे.
-
राज्यातील सुमारे ९६.२% लोक साक्षर आहेत तर क्रमवारीत आंध्र प्रदेश ६६.४% सह सर्वात तळाला राहिले आहे.
साक्षरता टक्केवारीनुसार क्रमवारी
-
केरळ (९६.२%)
-
दिल्ली (८८.७%)
-
उत्तराखंड (८७.६%)
-
हिमाचल प्रदेश (८६.६%)
-
आसाम (८५.९%)
सर्वेक्षणातील मुख्य निष्कर्ष
-
भारतातील एकंदरीत साक्षरता दर ७७.७% आहे
-
ग्रामीण भागातील साक्षरतेचे प्रमाण ७३.५% आहे
-
शहरी भागातील साक्षरतेचे प्रमाण ८७.७% आहे
-
सर्व राज्यांमध्ये पुरुष साक्षरतेचे प्रमाण स्त्री साक्षरतेच्या तुलनेत जास्त आहे.