-
जम्मू-काश्मीर कृषी विभागामार्फत जीआय-टॅग (GI-tag) असलेल्या ‘काश्मीर केशर’ चा व्यापार वाढविण्याच्या उद्देशाने 'ई-ऑक्शन पोर्टल (E-Auction Portal)' चे अनावरण करण्यात आले आहे. खरेदीदारांना दर्जेदार ‘काश्मीर केशर’ मिळण्याची हमी देण्याच्या प्राथमिक उद्देशाने सदर पोर्टलची सुरूवात करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
भारतीय आंतरराष्ट्रीय काश्मीर केशर व्यापार केंद्र (India International Kashmir Saffron Trading Centre - IIKSTC) च्या मार्गदर्शनाखाली विभागाने एनएसई-आयटीच्या (NSE-IT) भागीदारीत पोर्टल सुरु केले आहे.
-
काश्मीर खोऱ्यातील केशर उत्पादक तसेच संपूर्ण देशातील खरेदीदारांना या पोर्टलवर ई-व्यापारासाठी विक्रेते व खरेदीदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भौगोलिक निर्देशांक (Geographical Indication - GI) टॅग बाबत ठळक मुद्दे
-
भारतातील भौगोलिक निर्देशांक नोंदणी ही 'वस्तूंची भौगोलिक नोंदणी आणि संरक्षण अधिनियम (Geographical Indications of Goods (Registration and Protection Act), १९९९' द्वारे केली जाते जी सप्टेंबर २००३ पासून आमलात आणली गेली.
-
GI टॅगमुळे उत्पादनांचा बेकायदेशीर वापर होण्यापासून संरक्षण मिळते आणि स्थानिक उत्पादकांना त्याचा फायदा होतो.
-
चेन्नई, तमिळनाडू येथे भौगोलिक निर्देशांक नोंदणी कार्यालयाचे मुख्यालय आहे.