• नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांची नुकतीच संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यामार्फत शाश्वत विकास ध्येय (Sustainable Development Goals - SDG) वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ७६ व्या संयुक्त राष्ट्र आमसभेत सदर निर्णय घेण्यात आला आहे.

  • सत्यार्थी यांच्या नेमणुकीसह सध्या संयुक्त राष्ट्रांकडे एकूण १६ SDG वकील कार्यरत आहेत.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.