-
टाटा ट्रस्टच्या पुढाकाराने जाहीर करण्यात आलेल्या भारतीय न्याय अहवालाच्या (India Justice Report - IJR) दुसर्या आवृत्तीत महाराष्ट्र १८ मोठ्या आणि मध्यम आकाराच्या राज्यांमध्ये (१ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या) अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर दुसर्या आवृत्तीत लोकांपर्यंत न्याय पोहचविण्याबाबत भारतातील केवळ राज्यांची क्रमवारी दर्शविण्यात आली आहे.
-
या यादीमध्ये महाराष्ट्र राज्यानंतर तमिळनाडू, तेलंगणा, पंजाब आणि केरळ या राज्यांचा क्रमांक लागतो.