-
अँटिग्वा आणि बारबुडा हे कॅरिबियन राष्ट्र नुकतेच 'आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये (International Solar Alliance - ISA)' १०२ वे सदस्य म्हणून सामील झाले आहे.
ठळक मुद्दे
-
अँटिग्वा आणि बारबुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी भारतीय उच्चायुक्त डॉ. के. जे. श्रीनिवास यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी केली.
ISA बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ISA म्हणजेच International Solar Alliance अर्थात 'आंतरराष्ट्रीय सौर आघाडी' होय.
-
स्थापना वर्ष: २०१५ मध्ये ISA ची स्थापना झाली होती.
-
स्थापनेचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स येथे आंतरराष्ट्रीय सौर युतीची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: गुरुग्राम, हरियाणा हे ISA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
महासंचालक: अजय माथूर हे सध्या ISA च्या महासंचालक पदावर विराजमान आहेत.