• इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League - IPL) २०२० चे विजेतेपद प्रायोजित करण्याचे हक्क फँटसी गेमिंग स्टार्ट-अप 'ड्रीम ११ (Dream ११)' ने मिळवले आहेत. सदर स्टार्ट-अपने २२२ कोटींमध्ये प्रायोजकत्व शीर्षकाचे अधिकार मिळविले आहेत.

ठळक मुद्दे

  • IPL २०२० च्या प्रायोजकत्व शीर्षकाचे अधिकार मिळवण्याच्या शर्यतीतून चायनीज मोबाईल फोन ब्रँड विव्हो (Vivo) बाहेर पडल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (Board of Control for Cricket in India - BCCI) आमंत्रित केलेल्या योजनेमुळे ड्रीम ११ ला हे अधिकार प्राप्त झाले आहेत.

  • फँटसी गेमिंग स्टार्ट-अप 'ड्रीम ११' ने मिळविलेल्या शीर्षक हक्कांची वैधता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत आहे.

महत्वपूर्ण माहिती

  • ड्रीम ११ चे संस्थापक: हर्ष जैन आणि भावित शेठ हे ड्रीम ११ चे संस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी: हेमंग अमीन हे सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षः सौरव गांगुली हे सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.