-
आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या (International Solar Alliance - ISA) अध्यक्षपदी भारताची पुन्हा निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
नुकत्याच पार पडलेल्या आभासी बैठकीदरम्यान २ वर्षांच्या मुदतीसाठी भारत आणि फ्रान्स यांची आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या (International Solar Alliance - ISA) अनुक्रमे अध्यक्ष आणि सह-अध्यक्ष पदावर पुन्हा निवड करण्यात आली आहे.
-
एकूण ५३ सदस्य देशांनी यामध्ये आपला सहभागी नोंदविला होता.
आंतरराष्ट्रीय सौर युतीबाबत (International Solar Alliance - ISA) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: २०१५ मध्ये ISA ची स्थापना झाली होती.
-
स्थापनेचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स येथे आंतरराष्ट्रीय सौर युतीची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: गुरुग्राम, हरियाणा हे ISA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
महासंचालक: उपेंद्र त्रिपाठी हे सध्या महासंचालक पदावर विराजमान आहेत.