-
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमार्फत (Employees’ Provident Fund Organisation - EPFO) आर्थिक वर्ष २०२०-२१ मधील भविष्य निर्वाह निधी ठेवीवरील व्याज दर ८.५ टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
२०१९-२० प्रमाणे हा दर कायम ठेवण्यात आला आहे.
-
केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या वतीने कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला आहे.
EPFO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: EPFO म्हणजेच Employees’ Provident Fund Organisation अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना होय.
-
मुख्य कार्यकारी अधिकारी: सुनील बर्थवाल हे सध्या EPFO च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आहेत.
-
स्थापना वर्ष: ४ मार्च १९५२ मध्ये EPFO ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे EPFO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.