• माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना २० ऑगस्ट रोजी त्यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त विशेष श्रद्धांजली वाहण्यासाठी राजस्थान सरकारकडून 'इंदिरा रसोई योजना' सुरू करण्यात आली आहे. इंदिरा रसोई ही नावाप्रमाणेच शहरी भागातील गरीब लोकांना परवडणार्‍या किंमतीमध्ये पोषक आहार पुरविणारी योजना आहे.

इंदिरा रसोई योजनेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • सदर योजनेंतर्गत राज्य सरकार लोकांना ८ रुपये दराने पौष्टिक आहार जेवणाच्या रूपात उपलब्ध करून देईल. थाळीची प्रत्यक्ष किंमत २० रुपये आहे मात्र सरकार दर थाळीमागे १२ रुपये अनुदान देईल अशी सोय करण्यात आली आहे.

  • सदर योजनेवर वर्षाकाठी १०० कोटी रुपये इतका अपेक्षित खर्च आहे.

  • सरकारमार्फत राज्यभरातील २१३ नागरी स्थानिक संस्थांमध्ये ३५८ स्वयंपाकघरे अर्थात रसोई उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

  • उपहारगृहामध्ये जाऊन लोकांना सन्मानाने त्यांचे जेवण खाऊ घालण्याचे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.

राजस्थान राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: अशोक गहलोत हे सध्या राजस्थान राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: कलराज मिश्रा हे सध्या राजस्थान राज्याच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: ३० मार्च १९४९ रोजी राजस्थानची स्थापना झाली होती.

  • राजधानी: जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे.