-
भारतीय सैन्यामार्फत ‘Secure Application for the Internet (SAI)' नावाच्या सुरक्षित मेसेजिंग अॅप्लिकेशन प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर मोबाईल अॅप्लिकेशन मजकूर आणि व्हिडीओ कॉलिंग सारख्या सुरक्षित सेवांना समर्थन देईल अशी अपेक्षा आहे.
-
पॅन आर्मीमार्फत SAI चा वापर मेसेजिंग सुनिश्चित करण्यासाठी केला जाईल.
भारतीय लष्कराबाबत (Indian Army) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १ एप्रिल १८९५ साली भारतीय लष्कराची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे भारतीय लष्कराच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
ब्रीदवाक्य: 'स्वतःआधी सेवा (Service Before Self)' हे भारतीय लष्कराचे ब्रीदवाक्य आहे.
-
भारतीय लष्कर दिन: १५ जानेवारी हा भारतीय लष्कर दिन म्हणून साजरा करण्यात येतो.