-
ओडिशातील बालासोर येथून ‘मेड इन इंडिया’ उपप्रणालींसह स्वदेशी बूस्टर आणि एअरफ्रेम विभाग असलेल्या ब्राह्मोसची (पृष्ठभाग ते पृष्ठभाग सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र) यशस्वी उड्डाण चाचणी घेण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
स्वदेशी सामग्री वाढविण्याच्या उद्देशपूर्तीसाठी ही एक मोठी पायरी आहे.
-
'ब्राह्मोस लँड-अटॅक क्रूझ मिसाईलचा (BrahMos Land-Attack Cruise Missile - LACM)' वेग मॅक २.८ होता.
DRDO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organisation अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय.
-
अध्यक्ष: डॉ. जी. सतीश रेड्डी हे सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत.
-
स्थापना वर्ष: १९५८ साली DRDO ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय आहे.
-
संस्थेचे ब्रीदवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.