• मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पाचा युनेस्कोच्या ‘जैव राखीव क्षेत्रांच्या जागतिक यादीमध्ये (World Network of Biosphere Reserves)' नुकताच समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • पंचमढी आणि अमरकंटक नंतर ‘जैव राखीव क्षेत्रांच्या जागतिक यादीमध्ये (World Network of Biosphere Reserves)' समाविष्ट होणारे पन्ना व्याघ्र प्रकल्प हे भारतातील १२ वे तर मध्य प्रदेशमधील तिसरे जैव राखीव क्षेत्र आहे.

  • सध्या पन्ना व्याघ्र प्रकल्पामध्ये ५४ वाघांचे वास्तव्य आहे.

UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.