• यूएस-आधारित पत मानांकन संस्था मूडीजमार्फत आर्थिक वर्ष २०२० - २१ साठी भारताचा अंदाजित GDP दर ७% नी आकुंचन पावण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • GDP दर १०.६ टक्क्यांनी आकुंचन पावण्याच्या मागील अंदाजापेक्षा हा अंदाज कमी आहे.

  • मूडीजने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये अर्थव्यवस्थेत १३.७ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे

मूडीजबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९०९ साली मूडीज कंपनीची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे मूडीजचे मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थापक: जॉन मूडी हे या कंपनीचे संस्थापक आहेत.

  • संस्थेचे स्वरूप: बाँड क्रेडिट रेटिंग अर्थात पत मानांकन संस्था या स्वरूपात ही कंपनी कार्यरत आहे.