-
मूडीजमार्फत (Moody’s) नुकताच आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारताच्या GDP वाढीचा दर ९.३% इतका राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
आपल्या ताज्या अहवालात भारतातील आर्थिक विकासाला जोरदार गती येईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
-
आर्थिक वर्ष २०२३ साठी हा दर ७.९% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मूडीजबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९०९ साली मूडीज कंपनीची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे मूडीजचे मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थापक: जॉन मूडी हे या कंपनीचे संस्थापक आहेत.
-
संस्थेचे स्वरूप: बाँड क्रेडिट रेटिंग अर्थात पत मानांकन संस्था या स्वरूपात ही कंपनी कार्यरत आहे.