• S&P ग्लोबल रेटिंग्समार्फत आर्थिक वर्ष २०२१-२२ भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product -GDP) वाढीचा दर ९.५ टक्के इतका राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • आर्थिक वर्ष २०२३ साठी हा दर ७.८ टक्के असा कायम ठेवला आहे.

  • आर्थिक वर्ष २०२४ साठी भारताचा हा दर अंदाज ६ टक्क्यांवर सुधारित करण्यात आला आहे.

एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जबाबत (S&P Global Ratings) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: S&P Global Ratings म्हणजेच पूर्वी ओळखली जाणारी Standard & Poor’s ही पत मानांकन संस्था होय.

  • स्थापना वर्ष: १८६० साली S&P Global Ratings ची स्थापना झाली होती.

  • संस्थापक: हेन्री वर्णम पुअर यांनी या संस्थेची स्थापना केली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे S&P Global Ratings च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्षः जॉन बेरीसफोर्ड हे सध्या कंपनीच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.