• देशांतर्गत पतमानांकन एजन्सी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या क्रिसिलमार्फत आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारताची GDP वाढ ९.५% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • आथिर्क वर्ष २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७.३ टक्क्यांनी घसरल्याचे क्रिसिलने व्यक्त केले आहे.

क्रिसिलबाबत (CRISIL) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: CRISIL म्हणजेच पूर्वी ओळखली जाणारी Credit Rating Information Services of India Limited अर्थात पत निर्देशांक माहिती सेवा देणारी संस्था होय.

  • स्थापना वर्ष: १९८७ साली CRISIL ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे CRISIL च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अंतरिम मुख्य वित्त अधिकारी: अनुराग शुक्ला हे सध्या या पदावर विराजमान आहेत.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: आशु सुयश हे सध्या या पदावर आहेत.