-
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India - SBI) आर्थिक संशोधन विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताचा GDP दर -७% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
यापूर्वी GDP दराबाबतचा अंदाज -७.४% इतका होता.
-
आर्थिक वर्ष २०२२ मधील GDP चा अंदाज ११ टक्के इतका कायम राहिला आहे.
SBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: SBI म्हणजेच State Bank of India अर्थात भारतीय स्टेट बँक होय.
-
अध्यक्षः दिनेश कुमार खारा हे सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १ जुलै १९५५ रोजी बँकेची स्थापना झाली होती.
-
संस्थेचे स्वरूप: सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांतर्गत येणारी संस्था असे बँकेचे स्वरूप आहे.
-
सेवा प्रदान: बँकिंग व आर्थिक सेवा SBI मार्फत पुरवल्या जातात.