-
S&P ग्लोबल रेटिंग्जमार्फत २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी GDP वाढीचा अंदाज १० टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
देशांतर्गत खाजगी खर्चाला चालना देण्याच्या उद्देशास्तव विस्तारित वित्तीय धोरणामुळे सदर अंदाज वर्तविण्यात आला आहे.
एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जबाबत (S&P Global Ratings) महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: S&P Global Ratings म्हणजेच पूर्वी ओळखली जाणारी Standard & Poor’s ही पत मानांकन संस्था होय.
-
स्थापना वर्ष: १८६० साली S&P Global Ratings ची स्थापना झाली होती.
-
संस्थापक: हेन्री वर्णम पुअर यांनी या संस्थेची स्थापना केली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे S&P Global Ratings च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अध्यक्षः जॉन बेरीसफोर्ड हे सध्या कंपनीच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.