• संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development Organisation - DRDO) आणि भारतीय लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने भारताची पहिली स्वदेशी-विकसित ९ मिमी मशीन पिस्तूल विकसित करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • महू येथील इन्फंट्री स्कूल आणि DRDO च्या पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (Armament Research & Development Establishment - ARDE) मार्फत त्यांचे संबंधित कौशल्य वापरून हे शस्त्र तयार करून विकसित करण्यात आले आहे.

  • या शस्त्राचे नाव 'अस्मी (Asmi)' असे आहे ज्याचा अर्थ गर्व, स्वाभिमान आणि कठोर परिश्रम असा होतो.

DRDO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organisation अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय.

  • अध्यक्ष: डॉ. जी. सतीश रेड्डी हे सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत.

  • स्थापना वर्ष: १९५८ साली DRDO ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय आहे.

  • संस्थेचे ब्रीदवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.