• लडाखमध्ये तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामार्फत (Oil and Natural Gas Corporation - ONGC) भारताचा पहिला भूगर्भीय ऊर्जा प्रकल्प (Geothermal Power Project) स्थापन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर प्रकल्पाची ३ टप्प्यात अंमलबजावणी करण्यात येणार असून सन २०२२ च्या अखेरीस कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ONGC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ONGC म्हणजेच Oil and Natural Gas Corporation अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ होय.

  • स्थापना वर्ष: १९५६ साली ONGC ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे ONGC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.