• ओडीशाचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक यांच्या हस्ते भुवनेश्वरमध्ये भारतातील पहिल्या ‘फायर पार्क (Fire Park)’ चे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • लोकांमध्ये विशेषत: विद्यार्थ्यांना अग्निशामक सुरक्षा उपायांबाबत शिक्षित करत जागरूकता निर्माण करण्यासाठी सदर पार्कचे अनावरण करण्यात आले आहे.

  • सदर ‘फायर पार्क’ भुवनेश्वरमधील ओडीशा अग्निशमन आणि आपत्ती अकादमीच्या (Odisha Fire and Disaster Academy) आवारात स्थित आहे.

  • पटनाईक यांनी ओडीशा अग्निशमन सेवेच्या ‘अग्निशमासेवा (AgnishamaSeva)’ नावाच्या ऑनलाईन पोर्टलचे अनावरण केले आहे.

ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.