• उत्तराखंडमार्फत नुकतेच 'उत्तराखंड भूकंप अलर्ट (Uttarakhand Bhookamp Alert)' नावाच्या भूकंपसूचक मोबाईल अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • उत्तराखंडचे मुख्यमंत्री श्री. पुष्करसिंग धामी यांच्यामार्फत सदर अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

  • उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (Uttarakhand State Disaster Management Authority - USDMA) सहकार्याने IIT रुरकीतर्फे सदर अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे.

उत्तराखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: ९ नोव्हेंबर २००० साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती.

  • मुख्यमंत्री: पुष्कर सिंग धामी हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: बेबी राणी मौर्य सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राजधानी: उत्तराखंड राज्याच्या गैरसैंण (उन्हाळी) आणि देहरादून (हिवाळी) अशा २ राजधान्या आहेत.