• नुकताच मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे देशातील 'पहिला ड्रोन मेळा (First drone Mela)' आयोजित करण्यात आला होता.

ठळक मुद्दे

  • सदर मेळ्याचे आयोजन हे नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारत सरकार, मध्य प्रदेश सरकार तसेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीमार्फत (FICCI) करण्यात आले होते.

मध्य प्रदेश बाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: मंगूभाई छगनभाई पटेल सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राज्यनिर्मिती वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: भोपाळ ही सध्या मध्य प्रदेशची राजधानी आहे.

  • राज्याची विशेषता: मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.