-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली मेट्रोच्या मॅजेन्टा लाईनवर देशातील पहिल्या पूर्ण-स्वयंचलित विनाचालक ट्रेन (Fully-Automated Driverless Train) सेवेचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
DMRC ला राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड (National Common Mobility Card - NCMC) सेवेशी जोडण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते दिल्ली मेट्रोच्या एअरपोर्ट एक्स्प्रेस लाईनवर NCMC चे देखील अनावरण करण्यात आले आहे.
NCMC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
NCMC म्हणजेच National Common Mobility Card अर्थात राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड होय.
-
NCMC ला ‘वन नेशन वन कार्ड (One Nation One Card)’ म्हणून देखील ओळखले जाते.
-
एक आंतर-चालनीय वाहतूक कार्ड म्हणून धारकांना याद्वारे सर्व सेवांमध्ये प्रवास, पार्किंग शुल्क, किरकोळ खरेदी तसेच पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होते.