• केरळचे राज्यपाल श्री. आरिफ मोहम्मद खान यांच्यामार्फत केरळ युनिव्हर्सिटी ऑफ डिजीटल सायन्सेस, इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी (Kerala University of Digital Sciences, Innovation and Technology) नावाच्या भारतातील पहिल्या डिजीटल विद्यापीठाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • मंगलापुरम या केरळच्या टेक्नोसिटीमध्ये सदर डिजीटल विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे.

केरळ राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्य दर्जा प्राप्त वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: तिरुवनंतपूरम ही केरळ राज्याची सध्याची राजधानी आहे.

  • राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान हे केरळच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • मुख्यमंत्री: पिनाराई विजयन हे सध्या केरळच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.