• केरळमधील कोची हे 'जल मेट्रो प्रकल्प (Water Metro Project)' असलेले भारतातील पहिले शहर बनले आहे.

ठळक मुद्दे

  • 'कोचीन शिपयार्ड लिमिटेडद्वारे' निर्मित २३ बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बोटींपैकी 'मुझिरिस' नावाची पहिली बोट डिसेंबर २०२१ मध्ये लॉन्च केल्यानंतर कोचीने हा बहुमान मिळविला आहे.

  • सदर प्रक्षेपण कोची वॉटर मेट्रो लिमिटेडद्वारे (KWML) संचालित प्रकल्पाचा एक भाग आहे.