• गुगल मॅपला (Google Maps) पर्याय निर्माण करण्यासाठी भारताच्या स्वदेशी विकसित MapMyIndia अ‍ॅपचा ISRO शी करार करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • ISRO आणि MapMyIndia यांच्यातील करारानुसार गुगल नकाशे व तत्सम सुविधेला पर्याय निर्माण करण्याची सूचना देण्यात आली आहे.

  • MapMyIndia च्या वापराने वापरकर्त्यांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

ISRO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था होय.

  • सध्याचे अध्यक्ष: के. सिवन हे सध्या ISRO च्या अध्यक्ष पदावर आहेत.

  • स्थापना वर्ष: १५ ऑगस्ट १९६९ रोजी ISRO ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: बंगळुरू, कर्नाटक हे ISRO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.