• फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंग या भारतीय हवाई दलात (Indian Air Force - IAF) औपचारिकपणे दाखल झालेल्या राफेल लढाऊ विमानाने उड्डाण करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला लढाऊ पायलट बनतील.

ठळक मुद्दे

  • भारतीय हवाई दलातील (IAF) १० भारतीय महिला सैनिक पायलटांपैकी त्या एक आहेत.

  • शिवांगी या उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या रहिवाशी आहेत.

  • २०१७ सालामध्ये कमिशनर झालेल्या महिला सेनानी वैमानिकांच्या द्वितीय तुकडीत शिवांगी सिंग यांचा समावेश करण्यात आला होता.

भारतीय वायुसेनेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: ८ ऑक्टोबर १९३२ रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना झाली होती.

  • हवाई दल प्रमुख: सध्या एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया हे IAF चे प्रमुख आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय वायुसेनेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • वायुसेना दिवस: ८ ऑक्टोबर हा दरवर्षी वायुसेना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

  • ब्रीदवाक्य: 'नभः स्पृशं दीप्तम्' हे IAF चे ब्रीदवाक्य आहे.