• केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंग यांच्यामार्फत BEML च्या बेंगळुरू कॉम्प्लेक्स येथे आयोजित कार्यक्रमात भारताच्या पहिल्या स्वदेशी विकसित विनाचालक मेट्रो कारचे (Driverless Metro Car) अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी (Mumbai Metropolitan Region Development Authority - MMRDA) स्वदेशी निर्मित आणि विकसित अत्याधुनिक विनाचालक मेट्रो गाड्या तयार केल्या जात आहेत.

  • MMRDA च्या MRS १ प्रकल्पासाठी BEML कडे एकूण ५७६ मोटारींची ऑर्डर असून जानेवारी २०२४ पर्यंत त्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे.