-
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते न्यूमोनियावरील ‘न्यूमोसिल (Pneumosil)’ नावाच्या भारतातील पहिल्या स्वदेशी लसीचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
पुणे-आधारित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India - SII) यांनी ‘न्युमोसिल’ नावाची न्युमोकोकल कॉन्जुगेट लस (Pneumococcal Conjugate Vaccine - PCV) बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन (Bill and Melinda Gates Foundation) आणि सिएटल आधारित आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था PATH यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केली आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाबाबत (Serum Institute of India - SII) महत्वपूर्ण माहिती
-
मुख्य कार्यकारी अधिकारी: अदार पूनावाला हे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १९६६ साली सदर संस्थेची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: सदर संस्थेचे पुणे हे मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थापक: सायरस एस. पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक आहेत.