-
१० ऑगस्ट २०२० ते १५ ऑगस्ट २०२० दरम्यान भारतीय रेल्वे 'स्वच्छता सप्ताह' साजरा करणार आहे. सदर आठवड्यात स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे संदेश देण्यात येतील.
ठळक मुद्दे
-
या आठवड्यादरम्यान भारतीय रेल्वेकडून विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.
-
स्टेशन कार्यालये, ट्रॅक, वर्कसाईट्स, वसाहती आणि रेल्वे स्थानकांच्या आसपास आणि इतर भागातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्याचे कार्य संपन्न होईल अशी अपेक्षा आहे.
-
या मोहिमेमध्ये ट्रॅकमधून प्लास्टिक कचरा संकलन करण्यावर भर देण्यात येणार आहे.
-
भारतीय रेल्वेमार्फत रेल्वे आणि रेल्वे स्थानकातील शौचालयांमध्ये स्वच्छता व सुव्यवस्था निश्चित करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.
भारतीय रेल्वेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: ८ मे १८४५ रोजी भारतीय रेल्वेची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय रेल्वेचे मुख्यालय आहे.
-
रेल्वेमंत्री: पीयूष गोयल हे सध्या रेल्वेमंत्री म्हणून कार्यरत आहेत.