• अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये भारतीय लष्करामार्फत 'कवच (Kavach)' नावाच्या संयुक्त युद्ध अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • अंदमान निकोबार कमांडच्या कृपाछत्राखाली सदर युद्ध अभ्यास संपन्न होणार आहे.

  • सदर संयुक्त युद्ध अभ्यासामध्ये भारतीय नौदल, भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दल यांचा सहभाग असेल अशी अपेक्षा आहे.

अंदमान आणि निकोबार बाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी अंदमान आणि निकोबारची स्थापना करण्यात आली होती.

  • राजधानी: पोर्ट ब्लेअर ही अंदमान आणि निकोबारची राजधानी आहे.

  • लेफ्टनंट गव्हर्नर: अ‍ॅडमिरल (निवृत्त) देवेंद्रकुमार जोशी हे सध्या लेफ्टनंट गव्हर्नर पदावर कार्यरत आहेत.