• भारतीय सशस्त्र दलाने चीनशी संबंधित तणावग्रस्त परिस्थितीत 'प्रकल्प चित्ता' पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर प्रकल्प बर्‍याच दिवसांपासून प्रलंबित होता. मात्र आता या त्रिदलांमार्फत ३५०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'अजय कुमार समिती' बाबत ठळक मुद्दे

  • नव्याने स्थापन झालेल्या उच्चस्तरीय संरक्षण मंत्रालयाच्या समितीकडे 'प्रकल्प चित्ता' पुनरुज्जीवित करण्याचा प्रस्ताव श्री. अजय कुमार यांच्या नेतृत्वात पाठविण्यात आला आहे.

  • अजय कुमार हे सध्या देशाच्या संरक्षण सचिव पदाची धुरा सांभाळत आहेत.

  • भारतीय सैन्य दल, नौदल आणि हवाई दलाच्या सर्व भांडवली खरेदीचे ते प्रभारी म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.

भारतीय सशस्त्र दलाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय सशस्त्र दलाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सर्वोच्च कमांडर: राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे सर्वोच्च कमांडर आहेत.

  • संरक्षण प्रमुख(Chief of Defence Staff): जनरल बिपिन रावत हे सध्या संरक्षण प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

  • संरक्षण सचिव: अजय कुमार हे सध्या संरक्षण सचिव पदावर कार्यरत आहेत.

  • सुरक्षा दलांची क्रमवारी: सैन्य दल (Army), नौदल (Navy), हवाई दल (Air Force) अशी सुरक्षा दलांची क्रमवारी आहे.