• 'इंडिया-थायलंड कोऑर्डिनेटेड पेट्रोल (India-Thailand Coordinated Patrol - Indo-Thai CORPAT)' ची ३० वी आवृत्ती भारतीय नौदल (Indian Navy) आणि रॉयल थाई नेव्ही (Royal Thai Navy) यांच्यात नुकतीच संपन्न झाली आहे.

ठळक मुद्दे

  • भारतीय नौदल जहाज (Indian Naval Ship - INS) कार्मुक (Karmuk) आणि थायलंडचे जहाज क्राबुरी (Kraburi) यांनी CORPAT सरावामध्ये भाग घेतला होता.

  • द्विपक्षीय संबंध आणि सागरी सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने दोन्ही नौदलांमार्फत २००५ पासून आंतरराष्ट्रीय समुद्री सीमा रेषांवर CORPAT सराव पार पाडला जात आहे.