-
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या २०२१ सालच्या FIFA क्रमवारीमध्ये भारत १०६ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
या क्रमवारीत भारतीय संघाचे स्थान एक अंकाने वाढले आहे.
-
सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भरतोय संघाने 'दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन (South Asian Football Federation - SAFF) चॅम्पियनशिप' २०२१ मधील विजयानंतर हे स्थान प्राप्त केले आहे.
इतर देशांची क्रमवारी
-
१. बेल्जियम
-
२.ब्राझील
-
३.फ्रान्स
FIFA बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: FIFA म्हणजेच Fédération Internationale de Football Association अर्थात आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना होय.
-
अध्यक्ष: जियानी इन्फॅंटिनो हे सध्या FIFA च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: २१ मे १९०४ रोजी FIFA ची स्थापन करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: झुरिच, स्वित्झर्लंड हे FIFA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सदस्यत्व: २११ राष्ट्रीय संघटना FIFA च्या सदस्य आहेत.
-
ब्रीदवाक्य: 'For the Game. For the World.' हे सदर संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.